पाचोरा प्रतिनीधी
पाचोरा शहरात दिनांक २१ रोजी सावनेरकर हाॅस्पीटलचे स्थलांतर भडगांव रोडवरील महादेव मंदिरा समोर करण्यात आले. आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. योगेंद्रसींह मौर्य तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक मुकुंद बिल्दिकर, डॉ. एस आर खानोरे, डॉ. रमेश संघवी डॉ. रामकृष्ण तेली, डॉ. भरत पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, डॉ. विजय जाधव, डॉ. दिनेश सोनार, डॉ. भरत पाटील, डॉ. नरेश गवांदे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, तिलोत्तमा मौर्य, नगरसेवक वासुदेव महाजन, आनंद पगारे, सावनेरकर हाॅस्पीटलचे संचालक डॉ. मुकुंद सावनेरकर, डॉ. विजय पाटील, डॉ. शितल सावनेरकर, डॉ. श्रद्धा पाटील, अथर्व सावनेरकर, आयुष सावनेरकर हाॅस्पिटलचे व्यवस्थापक आर. डी. पाटील सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. मुकुंद सावनेरकर यांच्या १७ वर्षै रुग्णसेवेच्या प्रधिर्ग अनुभवा नंतल त्यांनी भडगाव रोडवर स्व:चे हॉस्पिटल सुरू केले असून या मॅटेलिटी, सर्जीकल, लॅप्रोस्कोपी, सोनोग्राफी व स्किन केअर सेंटर यात ससज्य प्रसुती गृह, प्रसुतीपुर्व सल्ला, वंधत्व तपासणी व उपचार, गर्भाशय विकार, निदान व उपचार, सोनोग्राफी व कलर डाॅपलर, सुसज्ज आॅपरेशन थेअटर, दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपी सेंटर व सर्व प्रकारचे त्वचा रोग निदान यासारख्या विविध सेवा दिल्या जाणार असुन वैद्यकीय क्षेत्रातील बदलती अत्याधुनिक चिकित्सा पद्धती यामुळे पाचोरा तालुक्यासह परिसरातील रुग्णांना एकाच ठिकाणी रुग्ण सेवा घेता येणार आहे. डॉ. मुकुंद सावनेरकर यांच्या हाॅस्पिटलला आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी शुभेच्छा देवुन गोर – गरिब रुग्णांची सेवा देण्याचे आवाहन ही केले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post