अमरावती (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात हारळि बुद्रुक या गावातील बाल वैज्ञानिक कुमार अथर्व कदम याचे याने तयार केलेल्या छोट्या उपग्रहाचे यान दि.7/02/2021 रोजी अंतराळात यशस्वी रवाना झाले .भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम इटरनँशल फौडेशन व्दारा आयोजित स्पेशल रिसर्च पेलोड क्युब चँनल 2021 साठी कु अथर्व रविंद्र कदम याची बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली होती,या मध्ये त्याने अतिशय छोटा उपग्रह तयार केला.
या प्रक्षेपणाचे प्रात्यक्षिक रामेश्वरम येथून करण्यात आले.या ठिकाणाहून एकूण 100 उपग्रह एकत्रित रित्या सोडण्यात आले,व ते यशस्वी रित्या अंतराळात प्रस्थापित झाले,यामुळे अथर्वला गिनीज वर्ल्ड रेकाँर्ड, भारतीय बुक रेकाँर्ड, एशियन बुक रेकाँर्ड, वर्ल्ड बुक आँफ तर्फे सन्मानित करण्यात येणार आहे, बालवैज्ञानिक अथर्व कदम च्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी फौडेशनचे अध्यक्ष श्री संदिप पाटील सर, श्री रविंद्र कदम सर, सेक्रेटरी सौ वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. अशा अनेक मुला मुलीना भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन द्वारे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होत असल्याचे रवींद्र कदम सर यांनी कळविले आहे.

