अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची डॉ. केतकीताई पाटील यांनी केली पाहणी

0

बोदवड ;— येथील धोंडखेडा ता. बोदवड येथे अतिवृष्टीमुळे अनेक घरांत पाणी शिरून नुकसान झाले तसेच शेतीचेही खूप नुकसान झाले.यावेळी नुकसानग्रस्त भागात डॉ. केतकीताईपाटील यांनी भेट देवून पाहणी केली.

येथील तेजसिंग पाटील गट नं.९ यांची शेतजमीन वाहुन गेली. तसेच अनेक शेतात नाल्याचे पाणी शिरल्याने मका, कपाशी पिकांचे नुकसान झाले तसेच सखाराम राजपुत व लक्ष्मण सुपडू चांभार यांच्यासह अनेक घरात पाणी शिरून नुकसान झाले. यावेळी डॉ. केतकीताई यांच्याजवळ संवेदना व्यक्‍त करतांना शासनाने नुकसाग्रस्ताना त्वरित नुकसान भरपाई द्यावी,यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी केली तसेच नाल्याला संरक्षण भिंत बांधल्यास भविष्यात अशा घटना टाळल्या जाऊ शकतात असेही ग्रामस्थांच्या संवादातून स्पष्ट झाले.लोणवाडी येथे देखील चित्रलेखा सपकाळे,प्रेम सपकाळे,मुक्तार खा पठाण यांच्या घरात पाणी शिरून अतोनात नुकसान झालेले दिसून आले. येथील नागरिकांनी देखिल डॉ. केतकीताई यांनी शासन दरबारी कैफीयत मांडून मदत मिळवून दयावी अशी विनंती केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.