Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित भरपाई देण्याच्या मागणीसाठी माकपचे धरणे
    उत्तर महाराष्ट्र

    अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित भरपाई देण्याच्या मागणीसाठी माकपचे धरणे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 30, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अतिवृष्टीग्रस्तांना त्वरित भरपाई देण्याच्या मागणीसाठी माकपचे धरणे

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

    मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, कामगार आणि घरकामगार यांना झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानाची त्वरित भरपाई करण्याची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) जळगाव जिल्हा समितीने मंगळवारी, दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केले.

    यावेळी शेतकरी, शेतमजूर, घरकामगार आणि बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करून जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार वर्गाला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.

    निवेदनात म्हटले आहे की, जोरदार पावसामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली किंवा दगावली आहेत, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

    माकपच्या मागणीनुसार, राज्य शासनाने तातडीने पंचनाम्याचे काम पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, तसेच घर आणि जनावरांचे नुकसान झालेल्या लोकांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. आंदोलकांनी सरकारच्या दिरंगाईवर तीव्र संताप व्यक्त केला.

    #farmers jalgaon The Communist Party of India (Marxist) workers and domestic workers
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif