अतिरिक्त दडपण न घेता विद्यार्थ्यानी परीक्षांना सामोरे जावे

0

माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांचे प्रतिपादन, गैरमार्गाचा अवलंब टाळून उत्तम गुण मिळवा

जळगांव. दि.24-
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या 21 पासून सुरू झाल्या आहेत तर 1 मार्च पासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. पुर्व तसेच सराव परीक्षा वा वर्षभर सातत्याने केलेला अभ्यासाच्या माध्यमातुन कोणतेही दडपण, भिती न बाळगता बोर्डाच्या परीक्षांना सामोरे जावे. कॉपी तसेच गैरमार्गाचा मोह टाळून विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवावेत तसेच पर्यवेक्षक शिक्षक यांनी देखिल वर्षभर मुलांना घडविलेले असते याचा पालकांसह शिक्षकांनी देखिल स्वतःवर विश्वास ठेवून संस्थाचालक, केंद्र संचालक यांनी कॉपी व भयमुक्त परीक्षा अभियान राबविण्याची गरज आहे असे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास पं.महाजन यांनी लोकलाईव्हच्या मुलाखतीत बोलतांना सांगीतले.
केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्यावर एमएफपीटी अंतर्गत कारवाई प्रस्ताव
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या दहावी, बारावीच्या परीक्षा या मुलांना त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. यातुनच पुढचे भवितव्य ठरविले जाते. दहावी अथवा बारावीचे विद्यार्थी नियमित शाळा महाविद्यालयात जाउन वर्षभर अभ्यास करून सुद्धा पेपरच्या दिवशर कॉपी केली जाते या संदर्भात कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कॉपी व भयमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी सक्षम यंत्रणा जिल्हास्तरावरून राबविली जावी यासाठी केंद्र संचालक पर्यवेक्षक शिक्षक यांचे सहकार्य असणे गरजेचे आहे. परंतु विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक वा संबंधित संस्थाचालक यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यत हा प्रकार थांबणे शक्य नाही. कॉपीचा गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर ठराविक वेळेच्या आधी विद्यार्थ्यांची काटेकोर तपासणी करून आत सोडले जाते. यावेळी विद्यार्थी परीक्षार्थींजवळ काहीही नसते. परंतु परीक्षा मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या पथकास भेट दिलेल्या केंद्रावरील परीक्षा हॉलमधे गेल्यानंतर पर्यवेक्षक वा केंद्र व संचालक यांच्या मार्फतच बर्‍याच ठिकाणी हा गैर प्रकार आतमधे सुरू असतो हे निदर्शनास आले आहे. 5 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आलेल्या परीक्षा केंद्रावर का
ॅपी करण्यास प्रोत्साहन म्हणून केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांची जबाबदारी निश्चित करून एमएफपीटी अंतर्गत कारवाई प्रस्तावीत होउ शकते. सद्यस्थितीत बारावीच्या परीक्षेत इंग्रजी भाषेच्या पेपरला पहिल्याच दिवशी 14 विद्यार्थ्यांवर कॉपी करतांना आढळून आल्याने डिबारची कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात बारावीसाठी 72 तर दहावीची 131 परीक्षा केंद्रेे
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 72 पैकी 13 तर दहावीची 131 पैकी 10 केंद्र उपद्रवी आहेत. जिल्हयात 12वी परीक्षेत कॉपी करतांना आढळून आलेल्या विद्यार्थ्यांचे कारवाईमुळे शैक्षणिक नुकसान तर झालेच आहेत परंतु इतर सर्व घटकांवर देखिल त्याचा दुष्परीणाम झाला आहे. पुर्वी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र शोधावे लागत होते तसेच बहुतांश ठिकाणी तालुकास्तरावर परीक्षा केंद्र होते, तसे आज नाही, बहुतेक ठिकाणी परीक्षार्थींना शिक्षकच कॉपी करण्यासाठी प्रोत्साहित करतात, यात गुणवत्ता ढासळलेली आहे. बाहेरील जिल्ह्यातील बरेचसे परीक्षार्थी काही विशिष्ठ केंद्रात प्रवेश घेतात. अशा केंद्रावर चालणार्‍या गैरप्रकारास शिक्षकांचे प्रोत्साहन आढळून येते. यातुन विद्यार्थी, पालक, समाजाची फसवणूक होते. कॉपीच्या माध्यमातुन मिळणार्‍या गुणांचा केवळ फुगवटा असतो, गुणवत्ता नसते. या मुळे वर्षभर अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यावर त्याचा परीणाम होतो.
पालकांची भिती अनाठायी असून गेले वर्षानुवर्ष नववी पर्यत विद्यार्थी शाळेत एकटा येत असतो. परंतु परीक्षेच्या दिवशी पेपर सुरू होण्यापुवी परीक्षार्थीना सोडण्यासाठी बरेचसे पालक परीक्षा केंद्रावर येतात. त्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी करण्याची आवश्यकता नाही. पालकांचे, शिक्षकांचे प्रबोधनसह मुलांना त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यांना पेपर सोडवण्याविषयी मार्गदर्शन प्रबोधन करू शकतो. परीक्षा मंडळातर्फे परीक्षा केंद्रावरील विशेष सूचना निर्देश केलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने परीक्षा केंद्राला कुलुप लावण्यात येवू नये, गेटवर संशयास्पद स्थितीत कोणीही व्यक्ती परीक्षा संदर्भात आक्षेपार्ह साहित्य आत आणू नये याची खबरदारी घेण्यासाठी शिपाई /सेवक ठेवणे गरजेचे आहे,
स्पर्धा परीक्षांत सीबीएसईपेक्षा उत्तीर्ण मराठी माध्यमाचे विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक
यावल तालुक्यातील सांगवी परीक्षा केंद्रावर भरारी पथकासोबत तपासणीसाठी गेलो असता या केंद्रावर प्रवेशासाठी दोन गेट असून एका बाजूस असलेले चॅनल गेट कायमस्वरूपी बंद अवस्थेत असून दुसर्‍या गेटला कुलुप लावलेले आढळले यात भरारी पथक केंद्रावर पोचल्यानंतर आत जाण्यासाठी जो वेळ लागला त्या वेळेचे नियोजन पहाता गेट लावण्याचा उद्देश स्पष्ट होतो. असा अहवाल विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. अशा केंद्रावरील अधिकारी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. या केंद्रावर विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गाने पास करण्याचा होतो ते चुकीचे आहे.पेपर फुटण्याचा प्रकार स्मार्टफोनव्दारा होउ शकतो. म्हणून विद्यार्थ्यासह केंद्रप्रमुख,निरीक्षक, पर्यवेक्षक यांना मोबाईल परीक्षा हॉलमधे घेउन जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे.
सीबीएसई प्रमाणे राज्य शिक्षण मंडळ यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात यंत्रणा फारच कमी पडली आहे. जिओ टॅगींंग, वेब कास्टींगसारखे अत्याधुनिक यंत्रणा मर्यादित क्षेत्रात राबविता येउ शकते. सीबीएसई मंडळाला राज्य शिक्षण मंडळा कडून नाहरकत घ्यावी लागते. यात देण्यात येणार्‍या सुविधांचे स्पष्टीकरण नमुद केलेले असते. मध्यम व तसेच उच्च श्रेणी गटातील मुले सीबीएसई मधे शिक्षण घेउन उत्तीर्ण होत असले तरी राज्य सेवा तसेच विविध स्पर्घा परीक्षांमधे उत्तीर्ण होणार्‍यांमधे सीबीएसई पेक्षा राज्य मंडळाच्या मराठी माध्यमातुन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचेच प्रमाण निश्चितच अधिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.