अतिक्रमण विभागाच्या ट्रक्टर ट्रॉलीचे चाक निखळले; मनपा कर्मचारी बचावले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील बेंडाळे चौकात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या ट्रक्टरचे ट्रॉलीचे चाक अचानक निखळले होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे ट्रक्टर आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात कारवाईसाठी जात असतांना अचानकपणे ट्रॉलीच्या मागच्या चाकाचा ॲक्सल तुटला. ट्रक्टरवर बसलेले महापालिकचे कर्मचारी दिलीप ढंडोरे, कैलास सोनवणे, भानुदास ठाकरे, शेखर ठाकूर, सलमान बिस्ती, दीपक कोळी, मक्तेदार चेतन जोगदंड, मुकेश गुप्ता यांना कुणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान, दरम्यान ट्रक्टर चालकाने ट्रॉलीच्या एक्सल संदर्भात महापालिकेच्या उपायुक्तांना माहिती देण्यात आली होती. परंतू तरी देखील ट्रॉलीच्या बेअरींगचे काम झालेले नव्हते.

Leave A Reply

Your email address will not be published.