जळगाव – अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान जळगाव व खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटी संचलित मुळजी जेठा महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभाग आयोजित आनंदयात्री अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे पुण्यतिथी व बुद्धपौर्णिमेनिमित्त शनिवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे सचिव डॉ. अशोक राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रम मु.जे महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्सफरन्स हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता होईल. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाचे माजी संचालक डॉ. विलास चव्हाण हे भगवान गौतम बुद्ध यांचा विज्ञाननिष्ठ धम्मम या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.