पारोळा (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा, कांदबरी,गीत,लावणी,शाहीरी, पोवाडा आदी साहित्य प्रकारांचे खूप मोठ्या प्रमाणात लिखाण केले.अण्णाभाऊंचे साहित्य समाजपरिवर्तनासाठी गरजेचे असुन साहित्याच्या माध्यमातून अण्णांनी शोषित समाजाची वेदना मांडलेली आहे असे प्रतिपादन जिव्हाळा अॅडव्होकेट अॅकेडमीचे मुख्य संचालक अॅड विनोद बोरसे यांनी केले.
जिव्हाळा अॅडव्होकेट अॅकेडमीत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अॅड.विनोद बोरसे बोलत होते.अॅड.बोरसे यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, अण्णाभाऊ साठेंच्या फकिरा या कांदबरीला महाराष्ट्र शासनाने प्रथम पारितोषिक दिलेले आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी ते प्रभावित झालेले होते.संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्या शाहीरीतुन सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी अण्णांनी अथक प्रयत्न केले होते.त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णांचे योगदान महत्त्वपूर्ण होते असे देखील अॅड. बोरसेंनी सांगितले.
यावेळी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे सुमित अहिरे,सोनु मरसाळे,आबा मोरे, शैलेश मरसाळे,वरूण जाधव,सागर धुळकर ,भुषण गांगुर्डे,मयुर जाधव आदी उपस्थित होते

