नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सहा दिवसांपासून सुरुच असून तब्बल साडे पाच किलोने अण्णांचे वजन घटले असून डॉक्टरांनी त्यांना भरपूर पाणी पिण्याचा तसेच आरामाचा सल्ला दिला आहे. पण आंदोलकांमध्ये अण्णांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, कोअर कमिटीची तातडीची बैठक अण्णांनी बोलावली आहे. आंदोलनाची पुढची रणनिती या बैठकीत ठरविण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी केवळ कागद घेऊन येतात. ठोस आश्वासने केंद्र सरकारकडून नाहीत. निव्वळ धूळफेक चालली आहे. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हिताचे मोदी सरकार नाही. आता मोदी सरकारचीही घरी जाण्याची वेळ आली असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.
आजचा अण्णांच्या उपोषणाचा सातवा दिवश आहे. त्यांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले असून त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला. याचबरोबर, आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास १५ आंदोलकांची गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत. रामलीला मैदानावर गर्दीचा जोर जरी ओसरला असला तरी आंदोलकांमध्ये जोश अद्यापही कायम आहे.