यावल । तालुक्यातील अट्रावल येथे ऐनकाटणवर आलेल्या ७००० केळीच्या बागेची कोणीतरी माथेफिरूने ट्रॅक्टर फिरून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना दि. 13 रात्री घडली. या प्रकारामुळे शेतकर्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, अट्रावल येथील सुधाकर बळीराम पाटील यांचशेत रवींद्र बळीराम कोल्हे (रा.अट्रावल) यांनी सन 2016 ते 2020 पर्यंत पाच वर्षे करार नाम्याने गट नंबर 924 /923 यावल शिवार हे शेत दहा हजार रुपये बीघ्या प्रमाणे केलेले होते. त्यात 7000 केळीचे पिल बाग ऐनकाटनवर असलेले दि. 13 चे रात्री अज्ञात इसमाने ट्रॅक्टर फिरवून जमीनदोस्त केले. त्यात रवींद्र बळीराम कोल्हे यांचे सुमारे आजच्या केळीच्या भावानुसार दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले आहे.
शेत हे अट्रावल ते यावल रस्त्यावर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर नदीकाठी आहे. याबाबत सकाळी ते शेतात गेले असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मळयामध्ये नेमके कोणी ट्रॅक्टर फिरवले? असेल हा माथेफिरू आहे तरी कोण? ऐन शेतकर्यांच्या तोंडचा घास आलेला का? हिरावला गेला.