चाळीसगाव :- महाराष्ट्र भरात अनेक चो-या व चाळीसगाव शहरातील पंडीत मोतीराम सराफ दुकानातुन ९० ग्रॅम सोन्याचे दागीने चोरणारा हैदर सादीक सैय्यद (२९) रा भिवंडी गायबी नगर, ह मु मालेगाव अट्टल गुन्हेगारास चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी चे पोलीस नाईक राहुल पाटील, पो कॉ गोवर्धन बोरसे, गोपाल बेलदार, प्रविण सपकाळे या कर्मचा-यांनी ९ जुलै रोजी मालेगाव येथुन सिने स्टाईल ताब्यात घेतले असुन त्याच्या कडुन राज्यासह परराज्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांनी वर्तवली आहे. यानिमीत्त सराफ व्यावसायीक शामकांत भामरे यांनी पोलीस निरीक्षक व कर्मचा-यांचा सत्कार केला.


