अटीतटीच्या लढतीत मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटलांचा विजय

0

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीत अखेरपर्यंत चुरस पाहावयास मिळाली.

मतमोजणीला मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई महाविद्यालयात सकाळी ८ वाजेपासून सुरूवात झाली.थेट १९ व्या फेरी पर्यंत मोजक्या मतांनी आघाडीवर असलेल्या अँड.रोहिणी खडसे २० व्या फेरीत अचानक बँकफूट वर आल्यात.आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी २१ व्या फेरीत आघाडी घेतली.२० ते २३ फेरी दरम्यान बोदवड तालुक्यातील मतमोजणी होती.अखेरच्या फेरीत आघाडी घेत चंद्रकांत पाटील १,९८७ मतांनी विजयी ठरले.बोदवड तालुक्यातील मते निर्णायक ठरल्याने खडसेंची तीस वर्षाची सद्दी समाप्त होत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील विजयी ठरले.एकुण २३ फे-या

मतमोजणीच्या झाल्यात.पहिल्या फेरीत पाटील यांना ३०४ मताधिक्य मिळाले,२ फेरीत खडसेंना ४३६,३ फेरीत पाटील यांना ४९१,४ थ्या फेरीत खडसेंना १२७३चे मताधिक्य मिळाले.५ व्या फेरीत खडसे १५२२ वर पोहचल्या ६ व्या फेरीत खडसेंना २८७० ची आघाडी मिळाली.७ व्या फेरीत मताधिक्य कमी होत २११० राहिले.८ व्या फेरीत पुन्हा २७९६ मताधिक्य खडसेंनी घेतले.९ व्या फेरीत ३,२१९ मते खडसेंनी घेतली.१० व्या फेरीत खडसेंचे मताधिक्य पुन्हा कमी झाले.१५८५ वर त्या स्थिरावल्या.११ व्या फेरीत १३३७ वर मताधिक्य आले.

आणि २१ व्या फेरीत चंद्रकांत पाटील यांनी ६०० मताधिक्य घेतले.२२ व्या फेरीत २००० च्या मताधिक्यावर आले.आणि अखेर २३ व्या फेरीत १९८७ चे मताधिक्य घेऊन चंद्रकांत पाटील विजयी झाले

Leave A Reply

Your email address will not be published.