Sunday, May 29, 2022

अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून जळगाव महानगरतर्फे साजरी

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

देशाचे लोकप्रिय माजी पंतप्रधान श्रध्येय अटल बिहारी वाजपेयी यांची ९७ वी जयंती आज जळगाव जिल्हा महानगर तर्फे सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आली. यामध्ये महानगरातील नऊ मंडलामध्ये अटलजींच्या प्रतिमेचे पूजन, जेष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांचा सत्कार, अटलजींच्या काव्याचे वाचन व व्याख्यान तसेच युवा मोर्चा तर्फ कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम, जनजागृती पथनाट्य केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती कार्यक्रमातून देण्यात आली. तसेच सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

- Advertisement -

भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे अटलजींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, भाजपा जेष्ठ कार्यकर्त शांताराम आबा पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक सुर्यवंशी यांनी केले.

तसेच अटल जींच्या जीवनावर आधारी मंडलाचे माजी सरचिटणीस हेमंत शर्मा यांनी स्वरचित काव्याचे वाचन केले. या कार्यक्रम प्रसंगी श्रध्येय अटलजींच्या जीवनावरील विविध प्रसंग व केलेल्या कार्याचा उजाळा विषयी व्याख्यान भाजपा जेष्ठ कार्यकर्त शांताराम आबा पाटील यांनी केला. तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी अटलजींच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रम प्रसंगी गटनेते भगत बालानी, माजी महापौर सीमाताई भोळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, कार्यक्रमाचे संयोजक राहुल वाघ, सह संयोजक दिप्तीताई चिरमाडे, आनंद सपकाळे, जिल्हा पदाधिकारी बापू ठाकरे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, नीला चौधरी, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, गणेश माळी, मंडल अध्यक्ष, रमेश जोगी, परेश जगताप, शांताराम गावंडे, विजय वानखेडे, केदार देशपांडे, विनोद(शक्ति) महाजन, अजित राणे, संजय लुल्ला, विनोद मराठे,निलेश कुलकर्णी, आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, अशोक राठी, अशफाक शेख, मोहमम्द नूर शेख, सना जहांगीर खान, रेखाताई वर्मा, मनोहर पाटील,शालिक पाटील,किशोर चौधरी, संजय तिरमले,अनंत देसाई, रविनाना कोळी, मेजर दिलीप बडगुजर, युवा मोर्चाचे गौरव पाटील,भूषण जाधव, जयंत चव्हाण, भाऊसाहेब पाटील, गिरीश वराडे,दिपक पाटील,महेश राठी,उमेश सूर्यवंशी,योगेश पाटील,कपिल पाटील, सोनू पठाण, तौसीफ शेख, आदी जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार माजी तालुकाध्यक्ष संजय भोळे यांनी मानले.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या