भुसावळ (प्रतिनिधि )- आठवडे बाजारत गेलेल्या महिलेची तीन हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना रविवार, 29 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. निलीमा संजय पाटील (रा.मुंबई) या येथील रविवारच्या आठवडे बाजारात गेल्या असता त्यांच्या हातातील बॅगेत त्यांनी त्यांची पर्स ठेवली होती. त्या ती पर्स अज्ञात चोरट्याने लांबविली. त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएमसह तीन हजारांची रोकड होती. पर्स चोरी झाल्याचे लक्षात येताच परीसरात शोध घेतला असता पर्स मिळून आली नाही. याबाबत बाजारपेठ पोलिसात निलीमा पाटील यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक दीपक जाधव करीत आहेत.