नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जंबो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारिणीत ३५ सदस्यांचा समोवश आहे. १४ सदस्य, १० स्थायी आमंत्रित आणि ११ विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित गट) महासचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ता ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण ३५ सदस्य आहेत. यात अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा समावेश असून सहा महासचिवांचा समावेश करण्यात आला आहे. यात खा. सुनील तटकरे, बृजमोहन श्रीवास्तव, एसआर. कोहली, के. के. शर्मा, वाय. पी. त्रिवेदी, सैयद जलालुद्दीन वकील आणि एन. ए. मोहम्मद कुट्टी यांचा समावेश आहे. याशिवाय, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, कमलेश कुमार सिंह, वांथुंगो ओड्यू यांचा समावेश आहे.
स्थायी आमंत्रित सदस्य
माजी खा. मधुकर कुकरे, रामराजे निंबाळकर, धर्मराव आत्राम, धनंजय मुंडे, रूपाली चाकणकर, संजय बनसोड, आदिती तटकरे, अनिल भैदास पाटील, राजेंद्र जैन आणि विश्वजीत चंपावत .
विशेष आमंत्रित सदस्य
सच्चिदानंद सिंह, संजय कुमार सिंह, राजेंद्र शर्मा, शिवाजीराव गरजे, प्रताप चौधरी, पी. के. नरेश, अमिया सरकार, संजय प्रजापती, ओमिलो के संगमा, सलाम जॉय . सिंह आणि नवीन कुमार सिन्हा.