अजित पवार यांना कोरोनाची लागण

0

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.  इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना सौम्य लक्षणं असून मुंबईमधील घरात ते क्वारंटाइन झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या सर्व बैठका तसंच सकाळी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला होता.

यावेळी कोणतंही कारण सांगण्यात आलं नव्हतं. नमुने चाचणीसाठी पाठवले असता अजित पवार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, कोरोना काळात प्रशासकीय काम करताना अनेक दौरे आणि बैठकांमध्ये अजित पवार विशेष काळजी घेत आले आहेत. बैठकांमध्ये सोशल डिस्टंसिंग आणि सर्वानी मास्क घातले आहे कि नाही यावर त्यांच्या नेहमीच कटाक्ष राहतो. या कोरोना काळात अनेक ठिकाणी भेटी देतांना मास्क न वापरणाऱ्या किंवा व्यवस्थित न घातलेल्या अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना अजित पवार ताकीद देताना पाहायला मिळाले. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.