मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती,अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना दिली होती. अजित पवार यांच्या कबुलीनाम्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे अश्रु खरे असतील तर त्यांनी मागावी, अशी मागणी केली आहे. “बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूकच होती. त्याकाळात आमचंही स्वत:च मत होतं की इतके टोकाचे राजकारण करू नये. परंतु, त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. केवळ काही काही वरिष्ठ नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेबांच्या अटकेचा निर्णय घ्यावा लागला”, असा गौप्यस्फोट पवार यांनी केला. अजित यांच्या या भुमिकेवर संजय राऊत यांनी ट्विट करत ‘बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. बाळासाहेबांना अटक ही चूक होती..वगैरे वगैरे. हे कळायला इतकी वर्ष लागली असे म्हणत अजित दादा तुमचे अश्रू खरे असतील तर त्या अटके बद्दल माफी मागा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.