नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या राउज अॅव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला. यावेळी कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तीन तास कसून चौकशी केल्यानंतर सीबाआयने चिदंबरम यांना साडे तीन वाजता राउज अॅव्हेन्यू कोर्टात आणले. यावेळी छोट्या कोर्ट रुममध्ये आणल्याबद्दल चिदंबरम यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मला वाटलं मोठ्या कोर्टात मला आणलं जाईल, अशी मिश्किल टिप्पणी चिदंबरम यांनी केली. त्यानंतर सुनावणीस सुरुवात झाली. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना पाच दिवसाची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सीबीआयने कोर्टाला केली.