अजमेरच्या सुफी संतबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या देवगनचा फैजपूरात निषेध

0

फैजपूर (प्रतिनिधी) : अजमेर शरीफ सुफी संत ह. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती (रहे.) यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यामुळे न्युज 18 चे वृत्तनिवेदक अमीष देवगन यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एकता फाउंडेशन वतीने फैजपूर पोलीस स्टेशन व प्रांताधिकारी यांना निवेदन द्वारे करण्यात आली आहे.

न्यूज एटीन इंडिया या वृत्तवाहिनीवर अमिष देवगन नावाचे वृत्तनिवेदक ‘आरपार’ या नावाने डिबेट चर्चासत्र घेत होते व दरम्यान त्यांनी अजमेर शरीफ दर्ग्याचे प्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मैनोदीन चिश्ती रहे. यांच्याबद्दल अवमान कारक व अपशब्द बोलून हिंदू-मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून हजरत ख्वाजा मैनोदीन चिश्ती रहे. हे जग प्रसिद्ध मुस्लिम धर्मगुरू होते व आजही भारतात व जगात त्यांचे करोडो अनुयायी आहेत. तसेच मुस्लीम किंवा इतर धर्माचे लोक सुद्धा त्यांचे अनुयायी असून ही बाब देवगण यांना माहित असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून देवगन डिबेटच्या नावाखाली वारंवार मुस्लिम समाजाची बदनामी करत असून मुस्लिम धर्मगुरूंना महापुरुषांना अपशब्द वापरले जातात.

इस्लाम धर्माबद्दल गैरसमज पसरले जाते, इस्लाम धर्माची बदनामी केली जाते. देवगनची ही कृती दिवसेंदिवस वाढत चालली असून ही चुकीची कृती वेळीच थांबणे आवश्यक असून टीव्ही मीडियाचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम देशासाठी घातक असून न्यूज 18 चे निवेदक देवगण विरुद्ध कठोर कारवाई करून न्यूज 18 इंडिया या वाहिनीवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान शेख इकबाल यांनी फैजपूर पोलीस स्टेशनचे पिएसआय रोहिदास ठोंबरे व प्रांत कार्यालय येथील अव्वल कारकून यांना निवेदन द्वारे केली आहे.

यावेळी एकता फाउंडेशनचे उपाध्यक्ष अजय मेढे, सचिव शेख मुदस्सर शेख साबीर, अमोल मेढे, आसिफ, इस्माईल, गोल्डन मेढे, मोहसीन, शब्बीर, मुजाहिद, गफ्फार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.