गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला OnePlus 7 Pro हा स्मार्टफोन 14 मे रोजी लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढावा यासाठी कंपनीने एक शक्कल लढवली आहे. एका जाहीरातीद्वारे कंपनीने या फोनचा आराखडा जारी केला आहे. कंपनीने हा आराखडा पाहून वनप्लस 7 प्रोचं प्रॉसेसर, कॅमेरा, बॅटरी, रॅम इत्यादी गोष्टींबाबत अचूक अंदाज बांधण्यास सांगितलं आहे. बरोबर अंदाज बांधणारा व्यक्ती वनप्लस 7 प्रो जिंकू शकतो, असं कंपनीने जाहीर केलं आहे.
जर तुमचा अंदाज अचूक असेल आणि @oneplus_in या ट्विटर आयडीवर 8 मे रात्री 11:59 वाजेपर्यंत तुम्ही उत्तर पाठवलं असेल तर तुम्ही वनप्लस 7 प्रो जिंकू शकतात. याशिवाय इतर अनेक बक्षिसं जिंकण्याचीही संधी आहे. ट्विटरशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक या समाजमाध्यमांद्वारेही तुम्ही वनप्लस कंपनीच्या या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.