Wednesday, February 1, 2023

अख्ख तिरुपती पूरात; ५० वर्षांत पहिल्यांदाच भयावह पूर परिस्थिती (व्हिडिओ)

- Advertisement -

तिरुपती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तिरुपतीमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्या संपुर्ण भागात महापूर आला आहे. त्यामुळे वाहने आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली आणि संपुर्ण शहर पाण्यात बुडाले आहे. मुसळधार पावसामुळे यात्रेकरूंना मोठा त्रास सहन करावा लागला. भूस्खलनामुळे अधिकाऱ्यांना तिरुमलाच्या वर असलेल्या श्री व्यंकटेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते बंद करावे लागले.

- Advertisement -

तिरुमला मंदिरासाठी अलिपिरी पदपथ टेकड्यांवरून वाहणाऱ्या पाण्याने भरला होता. तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD), जे प्रसिद्ध मंदिराचे व्यवस्थापन करतात, त्यांनी आधीच मुसळधार पावसाचा अंदाज पाहता अलीपिरी आणि श्रीवरीमेटलू दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. तिरुमला येथील वैकुंठम रांग संकुलावरही पावसाचा परिणाम झाला. परिसराच्या तळघरात पाणी शिरले. टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी धर्मा रेड्डी यांच्या घरातही पावसाचे पाणी भरले आहे.

तामिळनाडूमध्ये आजही राजधानी चेन्नईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूशिवाय पुद्दुचेरी आणि कराईकलच्या अनेक भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर, चित्तूर आणि कडप्पा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर आला आहे, रस्ते तुडुंब भरले आहे

दरम्यान, तिरुपतीमध्ये आज पुराच्या धोक्याची कमाल पातळी जाहीर करण्यात आली आहे. तिरुपती शहरात पुराच्या पाण्यामुळे काही अंतरावर असलेली वाहनेही वाहून गेली आहे. शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचले आहे. ५ वर्षांत पहिल्यांदाच अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असून या संबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे