श्रीनगर: जम्मू-काश्मीरातील उधमपूरमधल्या मर्ता पंचायतीचे ग्रामस्थ स्वातंत्र्यापासून रस्त्याची वाट पाहत होते. अखेर स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी त्यांचं स्वप्न साकार झालं. रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं स्थानिकांनी आनंद व्यक्त केला.
रस्ता नसल्यानं मर्ताच्या ग्रामस्थांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. विद्यार्थ्यांना शेतांमधून सहा ते सात किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. अखेर स्वातंत्र्यानंतरच्या तब्बल सात दशकांनंतर उधमपूरला रस्ता मिळाला आहे. पंतप्रधान मंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचं काम पूर्ण झालं.