जामनेर | प्रतिनिधी
येथून जवळ असलेल्या चिचखेडा तवा गावी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील शिवसेना कार्यकर्ते मोहन रामजोशी व त्याच्या परिवाराला लाठी काठीने लोखंडी राॅड मारहाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात आज सकाळी दिनांक 17 5 2019 रोजी अखेर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सविस्तर माहिती अशी की दिनांक 14 मे रोजी फिर्यादी मोहन रामा जोशी याला व त्याच्या परिवाराला लग्नामध्ये मंगलाष्टके महिलांचे आवाजात म्हटले म्हणून या शुल्लक कारणावरून चिचखेडा गावी रात्री आठ-साडेआठच्या सुमारास शौचालयासाठी गेलेल्या मोहन जोशी याला घराकडे परत येत असताना रस्त्यात अडवणूक करून आरोपी अपील रामदास जोशी सरपंच गंगाराम श्रावण जोशी भगवान श्रावण जोशी नारायण शेषराव जोशी विनोद प्रकाश जोशी प्रकाश बारकू जोशी शेषराव श्रावण जोशी यांनी संगनमताने मोहन जोशी याला लाठी काठीने मारहाण करून मोहन जोशी याला डोळ्याला दुखापत केल्यामुळे आरोपी विरोधात पहूर पोलिस ठाण्यात फिर्यादी शिवसेना कार्यकर्ते मोहन रामा जोशी यांच्या फिर्यादीवरून भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 47 भादवि कलम 147 148 149 143 324 323 504 506 मुंबई अॅट37(1)(3) उल्लंघन केल्यामुळे 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक किरण शिंपी हे करीत आहे आरोपीला अजून अटक केली नाही….
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post