अखेर शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

पटना :- भाजपमधील बंडखोर खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शत्रुघ्न सिन्हा यांचे पाटणासाहेब मतदारसंघातून भाजपने तिकीट कापल्यामुळे ते भाजपवर नाराज होते. ते सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होते. अखेर त्यांनी भाजपच्या स्थापना दिनीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारमधील पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपने तिकीट कापल्यानंतर शत्रुघ्न सातत्याने काँग्रेसच्या संपर्कात होते. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे शत्रुघ्न भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यांच्या काँग्रेसप्रवेशाबाबत अधिकृत घोषणा करण्यात येत नव्हती. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.