अखेर वराह मालकाने उचलली जनावरे

0

जळगाव | प्रतिनिधी 

मोकाट डुकरांवर कारवाईबाबत मनपा प्रशासनाने डुकरे पकडण्याची निविदा काढली होती. मक्तेदाराला मक्ता दिल्यानंतर वराहमालकाने स्वत: आपली डुकरे पकडली असून त्याच्याद्वारा तो विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.

वराहमुक्त जळगावचा दावा फोल अशा आशयाची बातमी दै. लोकशाहीने लावली होती. मोकाट डुकरांबाबत मालिकाच लावण्यात आली होती. त्याचा परिणाम होवून मनपा प्रशासनाने पुन्हा कोटेशन प्रक्रिया त्वरेने करत मक्तेदाराला डुकरे पकडण्याचा मक्ता देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून मक्तेदाराने डुकरे पकडण्याच्या कामाला सुरुवातही केली आहे. या कारवाईने पोलीस प्रशासनालाही न जुमानणार्‍या अज्ञात वराह मालकांत खळबळ उडाली आहे.वराहमालकांनीही आपापली जनावरे उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार रविवारी संध्याकाळी ट्रकभर डुकरे पकडून त्याची विल्हेवाट डुक्करमालकाकडून शहराबाहेर करण्यात येत असल्याचे समजते. डुकरांच्या मुक्त संचारामुळे कांचननगर, भाऊची वखार, शनिपेठ, शिवाजी नगर परिसरात नागरिक कंटाळले होते. शहरातील विविध भागातील नागरिकांनी याबाबत आपल्या  तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत मनपा प्रशासनाने तातडीने कोटेशन काढून ते मक्तेदाराला मक्ता देण्यात आला होता. मक्तेदाराला 49 रु प्रति नग याप्रमाणे मक्ता देण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.