मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) रिया चक्रवर्तीला अनेक तासांच्या चौकशीअंती अटक केली आहे. रियाची वैद्यकीय चाचणी प्रथम केली जाईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यापूर्वीच NCB च्या अटकेत आहेत.
सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता. सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं शोविकने सांगितलं होतं. आतापर्यंत रिया चक्रवर्तीने आपण कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही, असं सांगत होती. पण आज सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाने प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली.
ड्रग्स बाबत सुरू असलेल्या तपासासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मंगळवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) चौकशी केली. आज पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. इतकचं नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली. आता NCB ड्रग्स प्रकरणात सुशांतचे सहकलाकार आणि अभिनेत्यांसह 25 बॉलिवूड कलाकारांना समन्स पाठविणार आहे.
रियाला मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनसीबी ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.