Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अखेर बहुप्रतिक्षित कोव्हिशिल्ड’ लशीचा पहिला डोस रवाना
    ताज्या बातम्या

    अखेर बहुप्रतिक्षित कोव्हिशिल्ड’ लशीचा पहिला डोस रवाना

    By January 12, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : कोरोनावर मात करण्यासाठी अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची देशातील जनता वाट पाहत होती, तो क्षण अखेर आला आहे. कोरोना प्रतिबंधक असलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे डोस सीरम इन्स्टिटयूटमधून देशातील १३ शहरांकरता रवाना करण्यात आले आहेत. पुण्याच्या सीरम इन्स्टिटयूटमधून कोव्हिशिल्ड लसीचे सहा कोल्ड स्टोरेज कंटेनर मोठ्या पोलिस बंदोबस्तात ४ वाजून ५५ मिनिटांनी रवाना झाले. यातील ३ कंटेनर हे पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना करण्यात आले. कोव्हिशिल्ड लसीच्या कोल्ड स्टोरेज कंटेनरची सीरम इन्स्टिट्यूटच्या परिसरात पूजा केली गेली. परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते कोल्ड स्टोरेज कंटेरनरची हार घालून, नारळ फोडून पूजा करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत पेढे वाटून अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला आहे. यानंतर हे कंटेनर देशभरात लसीचे डोस पोहोचवण्यासाठी रवाना करण्यात आले.

     

    कोव्हिशिल्ड लसीचे डोस देशातील अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांत पुणे विमानतळावरुन रवाना करण्यात आले. तर दिल्लीसाठी कोविशिल्ड लसीचे डोस घेऊन पहिले विमान सकाळी ८ वाजता पुणे विमानतळावरुन रवाना झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या ८ विमानांपैकी २ कारगो फ्लाईट आहेत.

     

    सीरम इन्स्टिट्यूटकडून केंद्र सरकारने सोमवारी ११ लाख कोटी कोरोना लसीच्या डोसची खरेदी केली आहे. यानंतर सीरमने तात्काळ हे कोरोना लसीचे डोस देशभरात रवाना केले आहेत. कोव्हिशिल्ड लस ही भारतीय बनावटीची असून ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आली आहे. तसेच या लसीची किंमत २१० रुपये प्रति डोस ठेवण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif