भुसावळ | प्रतिनिधी
अखेर तापी नदी पात्रात सुमारे एक महिन्याच्या कालावधीनंतर पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने तूर्तास तरी नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र पुढील काळात किती दिवस हा साठा पुरणार व पुन्हा नेमकी काय स्थिती निर्माण होणार अशी भीती नागरिकांना वाटू लागलेली आहे .
गेल्या महिनाभरापासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकत चटके सहन करावे लागले आहे . तापी पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याची मागणी नगरपालिकेने केली होती . मात्र हतनूर धरणातील पाण्याचा साठा केवळ २० ते २२ टक्केच असल्याचे पाहता प्रशासनाने उशिराने आवर्तन सोडले त्यामुळे दिपनगर , आयुध निर्मणी व रेल्वे प्रशासनाच्या बांधा-यातून पालिकेच्या बांधा-यात अखेर पाणी पोहचले . यामुळे शहरात होणारा पाणी पुरवठा हा रोटेशन प्रमाणे करण्यात येणार असल्याने अजून काही भागातील नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे .
उर्वरित वाचा उद्याच्या अंकात…
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post