अखेर टपाल कार्यालय पहिल्या मजल्यावर; आज उद्घाटन

0

जळगाव दि.23-
मनपा प्रशासनाकडून तळमजल्यावरील टपाल कार्यालयाचे स्थलांतर चौथ्या मजल्यावर करण्यात आले होते. मात्र नगरसेविका जयश्री धांडे यांच्या तक्रारीनंतर ते पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. सदर टपाल कार्यालयाचे उद्घाटन आज गुरुवारी महापौर सिमा भोळे यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी दिली.
काल मंगळवारी झालेल्या स्थायीच्या सभेत नगरसेविका जयश्री धांडे यांनी तळमजल्यावरील टपाल कार्यालय चौथ्या मजल्यावर हलविण्यात आले होते. मात्र मनपाची लिफ्ट नादुरुस्त असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ते पुर्ववत तळमजल्यावर आणावे अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र तेथे कायम दुर्गंधी असल्याची माहिती कर्मचार्‍यांनीच दिली होती. यावर सदस्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला होता. दरम्यान या कार्यालयाचे पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या शेजारी दर्शनी भागातच स्थलांतर करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.