भडगाव | प्रतिनिधी
अखेर ओव्हरलोड वाळुने भरलेला डंफर मालकाने दंड भरला.तालुक्यातून अवैध रेतीची प्रचंड वाहतूक चालू असते.त्याच प्रमाणे पाचोरा तालुक्यातील कुरंगी ठेक्यावरून प्रचंड प्रमाणात अनधिकृतपणे वाळूचा उपसा झालेला आहे.दरम्यान दि.१२ मे रोजी कुरंगी तालुका पाचोरा या ठेक्यावरिल रेतीचे भरलेले ओव्हरलोड डंफर नगरदेवळा स्टेशनजवळ पकडले गेले होते.हे डंफर ड्रायव्हर जोराने चालवित होता आणि त्यामध्ये ओव्हरलोड पध्दतीने वाळू भरलेली होती.सदर डंफरला तहशिल कार्यालयात जमा करून त्यावर दंडात्मक कारवाई साठी नोटीस पाठविली गेली असता. महाराष्ट्र जामिन महसूल अधिनियम चे कलम ४८( ७) नुसार आणि अनाधिकृत गौणखनिज उत्खनन व काढणे सुधारणा नियम २०१७ मृदा ( ७) नुसार डंफर क्रमांक एम एच १५ सीके ६३२७ यावर ३३६४४८ इतका दंड आकारुण नोटीस संबंधिताला देवुन दंड भरण्यास चक्क टाळाटाळ केल्यावर ठेकेदाराकडून काही ब्रास वाळू वाहतूक . पावत्या जोडून तसा खुलासा तहसीलदार भडगाव यांना सादर करण्याचा प्रयत्न केला. माञ घाबरून संबधीताने दंडाची रक्कम तहशिलला जमा केली. त्याचप्रमाणे सदरील डंफरमध्ये ओव्हरलोड पध्दतीने वाळू भरुन वाहतूक होत असल्याप्रकरणी आर . टि .ओ. विभागाला हि दंडात्मक कारवाईसाठी पत्र पाठविलेले आहे .अशी माहीती महसुल विभागाच्या सुञांनी दिली.