पाचोरा प्रतिनिधी
अखिल भारतीय मिना समाज महासभा या संघटनेचे
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रेमसिंह घुसिंगा यांच्या आदेशानुसार व प्रदेश उपाध्यक्ष विजयसिंग कायठे यांच्या शिफारशी नुसार शोभा जोनवाल यांची जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आली. पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील रहिवासी शोभा जोनवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मिना समाज महिला जागृती व संघटन मजबुत करण्यासाठी त्यांचे अनुभव व मार्गदर्शन समाजहितासाठी उपयोगात येतील व समाजासाठी तळमळीने कार्य करणार अशी महिती त्यांनी दिली. त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष छाया जोनवाल, संस्थापक अध्यक्ष नाहरसिंग सत्तांवन, मोहरसिंग सलावद, डाॅ. किरोडी लाल मिनाजी, प्रदेश युवक अध्यक्ष महाराष्ट्र विठ्ठलसिंग काकरवाल, जळगाव जिल्हा आध्यक्ष दिपक शेवाळ, राज्य संघटक दिपक डोभाळ, खान्देश विभाग प्रमुख रमेश जोनवाल, खान्देश विभाग सचिव सुभाष डोभाल, युवक प्रदेश सचिव महेंद्रसिंग खोडा, मिडीया प्रसिध्दि प्रमुख विलाससिंग सुलाने, औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष भिमसिंग घुसिंगा आणि चाळीसगाव तालुका अध्यक्ष गोकुळ चेडवाळ आदींनी निवडीबद्दल अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. शोभा जोनवाल यांच्या निवडीबद्दल सर्व समाज बंधु – भगिनिंनी त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

