अखंड दुर्गसेवेची १३ वर्ष, सलाम सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांना

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील तमाम गड किल्ले अडगळीत पडले होते बुरुज ढासळत होते तटबंद्या पडत होत्या तोफा जमिनीत गाडल्या गेल्या होत्या, सागवानी दरवाजे कधीच नाहीसे झाले होते, गडकोट फक्त टवाळ पर्यटक दारूबाज पार्टीवाले आणि विचित्र चाळे करणाऱ्यांचे अड्डे होत चालले होते.

पण अशातही गड-किल्ल्यांवर आस्था असणारे गड-किल्ल्यांवर नितांत प्रेम असणारे अनेक दुर्गप्रेंमी भटकंती वाले या गडकोटांवर जाऊन त्यांच्या संवर्धनाचा काहीसा प्रयत्न करीत होते मात्र हे काम एकट्या दुकट्याचे नाही तर याला संघटनेची वज्रमुठ हवी हे श्रमीक चंद्रशेखर गोजमगुंडे या गडकोटांवर भटकंती करणाऱ्या अवलियाच्या मनात आले आणि गडकोट संवर्धनासाठी एखादी संस्था असावी संघटना असावी याचा ध्यास त्यांनी मनाशी बांधला आणि मग बघता बघता *निलेश हनुमंत जेजुरकर सचिन शेंडगे गणेश खुटवड सदानंद पावले दिलीप रिंगणे दिलीप सोनवणे असे दुर्गप्रेमी सोबत घेत मोजक्या लोकांच्या साथीने श्रमिक गोजमगुंडे यांनी सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन संघटनेची स्थापना केली.

प्रतिष्ठानचे काम अनेक आंदोलने अनेक किल्ल्यांवरील संवर्धन चळवळींच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊ लागले बघता-बघता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गडकिल्ल्यांवर प्रेम करणारे अनेक शिलेदार सह्याद्री प्रतिष्ठान सोबत जोडले जाऊ लागले आणि या दुर्ग संवर्धनाच्या अग्निकुंडात आपले योगदान समिधा म्हणून अर्पण करू लागले अशाच सुरू असलेल्या कार्यात २०१६ साली सह्याद्री प्रतिष्ठानने घेतलेल्या मिशन ३०० या नावाने महाराष्ट्रातील तीनशे गड-किल्ल्यांवर एकाच दिवशी एकाच वेळी भगवा ध्वज फडकवून स्वच्छता मोहीम राबवत मानवंदना देण्याची घोषणा केली.

आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम दुर्गप्रेमींना साद घातली सह्याद्री प्रतिष्ठानचे कुशल संघटक निलेश जेजुरकर यांच्या आवाहनानुसार या मोहिमेत  खान्देशातील एकदुर्गप्रेमी दिलीप घोरपडे ,अनेक सहकार्‍यांसह सह्याद्री प्रतिष्ठानच्या मिशन ३०० मध्ये सामील झाले  आणि खानदेशातील जवळपास १३ किल्ल्यांवर ही मोहीम यशस्वीपणे राबवून सह्याद्री प्रतिष्ठान च्या कार्यास  सुरुवात केली यापूर्वी शुभम चव्हाण हा एकटा शिलेदार ही चळवळ खान्देशात सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करीत होता सह्याद्री प्रतिष्ठान मधील कार्य करत असताना बघता बघता अनेक गड-किल्ल्यांवर दुर्गसंवर्धन मोहीमा सुरू झाल्यात आणि गड किल्ले संवर्धनाची चळवळ यशस्वीपणे खांन्देशात सुरू झाली अनेक अडगळीत असलेले किल्ले लोकांना माहिती नव्हते ते लोकांच्या समोर आलेत आणि गड किल्ल्याच्या बाबतीत जनसामान्यांमध्ये प्रेम निर्माण होऊ लागले हे काम करत असताना अत्यंत समाधान मिळतच होते परंतु समाजामध्ये मानसन्मान प्रतिष्ठा देखील वाढतच होती शिवकार्य हे खरोखर अधिक समाधान देणारे आहे असे अनेक तरुणांना बालकांना महिलांना युवतींना वाटू लागले आणि ते महाराष्ट्रभरातून श्रमीक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर सह्याद्री प्रतिष्ठानच्या या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले आणि पाहता पाहता सह्याद्री प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रभर एखाद्या वटवृक्षा सारखे वाढतच गेले नेतृत्व इतक भक्कम आणि सक्षम होते की त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरील अडगळीत पडलेल्या तोफा पुन्हा एकदा सागवानी तोफगाड्यांवर वैभवाने विराजमान झाल्यात अनेक किल्ल्यांवरील प्रवेशद्वारांना सागवानी कवाडे बसवली गेली त्याचे मोठमोठे दुर्गार्पण सोहळे झालेत भंडारा उधळला गेला सह्याद्री प्रतिष्ठानच्या उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघणे हे प्रत्येक दुर्ग सेवकांना आपले भाग्य वाटू  लागले हे सगळे करत असताना ज्या जंजिरा किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांचा मिशन ३०० मध्ये भगवा ध्वज लावताना काही टवाळखोरांनी अपमान केला आणि भगवा ध्वज लावू दिला नाही.

त्याच जंजीऱ्यावर भगवाच नाहीतर हिंदुस्थानचा तिरंगा सन्मानाने फडकवण्याची शपथ सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी घेतली आणि महाराष्ट्रभरातील लोकप्रतिनिधी नगरसेवक संस्था यांच्या शिफारशीच्या  पत्रांचा ढीग केंद्रीय पुरातत्व विभागासमोर सह्याद्री प्रतिष्ठानने सादर केला आणि जंजिरा किल्ल्यावर  कायमस्वरूपी तिरंगा ध्वज लावण्याची परवानगी मिळवली आणि महाराष्ट्रातील तमाम दुर्गसेवकांच्या साक्षीने कोल्हापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा लावला गेला त्याचप्रमाणे जंजिऱ्याच्या समोर असलेल्या परम पवित्र पद्मदुर्ग किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज लावण्यात  आला सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन कार्याचा वारू चौफेर धावू लागला चाळीसगाव जवळील पाटणादेवी जंगलातील कन्हेरगडावर उभ्या खडकात जवळपास सत्तर पायऱ्या कोरून किल्ल्यावर जाण्यासाठी सुरक्षित रस्ता करण्यात आला यासाठी दुर्ग सेवकांनी अथक परिश्रम घेतले मल्हारगडाचे संवर्धन झाले खान्देशातील अनेक किल्ले देखील या संवर्धन कार्यात उजळून निघू लागले वेताळवाडी किल्ल्यावर अडगळीत पडलेला तोफेला तोफगाड्यावर बसविण्यात आले हे सर्व कार्य करीत असतानाच सह्याद्री प्रतिष्ठान ने कोरोना काळात महाराष्ट्रातील तमाम रुग्णांना रक्त अपुरे पडू नये म्हणून महाराष्ट्रभर रक्तदान चळवळ राबवून प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळपास दहा हजार पेक्षा जास्त बॉटल रक्तदान केले हे काम अजूनही सुरूच आहे ढासळत असलेल्या प्रतापगडाच्या माचीचे यशस्वीपणे संवर्धन करून तिला भक्कम करण्यात आले आज महाराष्ट्रातील तमाम गड किल्ले सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांन कडे अपेक्षेने पाहू लागलेत हे मावळे कधीतरी येतील आणि आपले संवर्धन होईल हा ऐतिहासिक अमोल ठेवा पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान अत्यंत आनंदाने करीत आहेत आणि हे काम करत असताना प्रत्येक दुर्गसेवकाला अभिमान आणि स्वाभिमान वाटतो आज प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन कार्यास १३ वर्ष पूर्ण झाले असले तरी इथून पुढचे अनेक वर्ष हे कार्य पिढ्यानपिढ्या सुरू राहील यात आता शंका नाही कारण येणाऱ्या पिढीला तसे संस्कार देण्यात प्रतिष्ठान आता यशस्वी होत आहे या संपूर्ण चळवळीची आणि सह्याद्री प्रतिष्ठान ची स्थापना करून महाराष्ट्रातील तमाम भटक्या गडप्रेमींना एका माळेत ओवून ही सुवर्णमाळ तयार करणाऱ्या श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे या आमच्या संस्थापक अध्यक्षाला त्रिवार मानाचा मुजरा…

सह्याद्री प्रतिष्ठानचा १३ वा वर्धापन दिन चिरायू होवो

दिलीप गणसिंग घोरपडे (चाळीसगाव )

मा.अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान,

Leave A Reply

Your email address will not be published.