Wednesday, May 18, 2022

अक्षय कुमारला मातृशोक.. उपचारादरम्यान अरूणा भाटिया यांचे निधन

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची आई अरूणा भाटिया यांचे आज सकाळी निधन झाले. याविषयी अक्षयने ट्वीट करून ही माहिती दिली.अरूणा गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मुंबईच्या हिरानंदानी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला.

- Advertisement -

आईची प्रकृती गंभीर आहे, हे कळताच अक्षय सोमवारी सकाळी ब्रिटनहून मुंबईला परतला होता. शूटींग अर्धवट सोडून तो आईला भेटायला पोहोचला होता. माझ्या आईसाठी प्रार्थना करा, अशी भावुक पोस्टही त्याने शेअर केली होती. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. प्रत्येक तास माझ्यासाठी कठीण आहे, अशी पोस्ट त्याने केली होती. मात्र आज सकाळी आईच्या निधनाची बातमीच त्याला मिळाली.

सोशल मीडियावर त्याने चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली. ‘ती माझा आधार होती आणि आज मला असह्य दु:ख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुस-या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. या दु:खप्रसंगी तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती,’ अशा शब्दात अक्षयने आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन दिली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या