अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पथकाची विशेष तपासणी मोहीम

0

भुसावळ :- मध्य रेल्वे अकोला स्टेशनवर रेल्वे गाड्यामधील व स्थानकावरील फुकट्या प्रवाशा विरुद्ध व अतिरिक्त सामान घेऊन प्रवास कणा-या प्रवाश्या विरुद्ध काल विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेत तब्बल 341 केसेस करण्यात आल्या असून एकूण 1 लाख 67 हजार 860 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. हि मोहिम सहायक वाणिज्य प्रबधंक (टी सी) अजय कुमार याच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली असून पथकात 30 तिकीट निरीक्षक व 02 रेल्वे सुरक्षा बलाचे सहभागी झाले होते.

या मोहिमेत बिना तिकीट यात्रा करणारे केसेस 105 यामध्ये ५६ हजार ४२० रुपयाचा दंड, अनियमित यात्रा करणारे केसेस 226 यामध्ये दंड १ लाख ७ हजार ४९०रुपये, बिना टिकिट बुक सामान केसेस 10 यामधे दंड ३ हजार ९५० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. या विशेष मोहिमेत एकूण केसेस 341 या दंड 1 लाख 67 हजार 860 रुपयाचा दंड प्रवाशाकडून वसूल केला. यामध्ये तिकीट चेकिंग स्टाफ एन पि पवार, एन पी अहीरराव, के के तनती, अफसर खान, शैख़ सत्तार, आनंदा सुरवाडकर, आनंदा शिंदे, वी के भंगाळे, वाय डी पाठक, विवेन रोड्रिक्, आर पी सरोदे, सी आर गुप्ता, विनय ओझा, वि के संचन, एस एन चौधरी, एस एम् जाधव, एन दी गाजरे, रफ़ीक, निसार खान व आदी तिकीट कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.