अंमली पदार्थाचे सेवन करून आलेल्या शिक्षकाने केली मुख्याध्यापकांना बेदम मारहाण

0

पळासखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
सागर महाजन
भडगाव ;- आज मंगळवार रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन असताना आणि विद्यार्थ्याना याबाबत प्रबोधन करण्याचे कार्य आहे अशा शिक्षकानेच आपल्या मुख्याध्यपकाला अंमली पदार्थाच्या नशेत चापट बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आज तालुक्यातील पळसखेडा येथे घडला . परंतु हि घटना एकट्या दुकट्यात नव्हे तर सरपंच, उपसरपंच व पदाधकाऱ्यांच्या समक्ष घडल्याने तालुक्यात या घटने बद्दल कर्मा या चित्रपटा मधील थप्पड की गुंज याची आठवण आल्याशिवाय राहत नाही .

या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पळसखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी उप शिक्षक भिमराव बायजूनाथ गोसावी व त्याचा साथीदार रुपासिंग बाबू जाधव रा. लोंढे ता. चाळीसगाव हे काहीतरी अंमली पदार्थ सेवन करून शाळेत आले. त्याला मुख्याध्यापक यांनी काहीतरी सांगितल्यानंतर शिक्षकाचे स्वतःवर नियंत्रण न राहिल्यामुळे त्याने चक्क सरपंच, उप सरपंच यांच्या समोर मुख्याध्यापक (नाव माहित नाही) याच्या कानशिलात लगावली व लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत खुर्ची फेकली . हे सर्व चित्र पाहून विद्यार्थी भयभीत झाले. व त्याला सर्व जण समजावू लागले की तू हे चुकीचे केले परंतु तो नशेत असल्यामुळे कोणाचीही ऐकून घेण्यास तयार नव्हता.

पळसखेड्याच्या शाळेत थप्पड की गुंज सूनाई दी

ही घटना पाहता शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यां समोर मुख्याध्यापक ला मारहाण केली. या घटनेबाबत कर्मा या हिंदी चित्रपटात अंमली पदार्थ तस्कर डॉ. डॉक्टर डॅन आणि जेलर राणा विश्वप्रताप सिंग यांनी डॉक्टर डॅनला थप्पड मारली . परंतु ती त्याच्या चुकीमुळे या घटनेत मुख्ख्याध्यापकाला विनाचुकीमुळे मार खावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.