चाळीसगाव : तालुक्यातील खडकी बु एम आय डी सी तील गुजरात अंबुजा कंपनीचा दुर्गंधीयुक्त उग्रवास पुन्हा सुरु झाला असुन या वासामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे हा दुर्गींधीयुक्त वास १५ दिवसाच्या आत बंद न झाल्यास चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर उग्र आंदोलनाचा ईशारा रयत सेनेच्या वतीने प्रांताधिकारी व गुजरात अंबुजा कंपनीला निवेदनाद्वारे आज दि.०९ रोजी देण्यात आला आहे.
रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाउ पवार व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील खडकी बु एम आय डी सी त असलेली गुजरात अंबुजा कंपनी मका व धान्यावर प्रक्रीया करुन उत्पादन करते या प्रक्रीयेवेळी त्याचा दुर्गंधीयुक्त उग्र वास परीसरात पसरतो त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मागील वर्षी अशाच पद्धतीचा उग्र वास येत असल्याने रयत सेनेच्या वतीने याविरोधात निवेदन देवुन वास बंद करण्याची मागणी केली होती आगोदर टाळाटाळ केल्यानंतर रयत सेनेने आंदोलन केल्यावर कंपनीने तो वास बंद केला होता मात्र यावर्षी गेल्या काही दिवसांपासुन हा दुर्गंधीयुक्त वास पुन्हा सुरु झाल्याने या दुर्गंधीमुळे आजूबाजूची गावे व शहरातील काही भागाच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण आहे या उग्र वासाने चाळीसगाव शहरातील विमानतळ मित्रा टाईप. शिवाजी नगर.नवलेवाडी .महाराणा प्रताप हाऊसिंग सोसायटी मालेगाव रोड हिरापूर रोड वरील सानेगुरुजी नगर शशीकला नगर. स्वामी समर्थ नगर .गवळी वाडा . पवार वाडी.महाविर कॉलनी . संभाजी नगर.आदर्श नगर भडगाव रोड वरील शास्त्रीनगर सम्राट नगर. शाहुनगर. करगाव रोड वामन नगर .शंभू नगर. धुळे रोड परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून या दुर्गंधीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ते आजारी पडत आहेत तसेच शेजारी असलेला खडकी बुद्रुक गावातील ग्रामस्थांना गावांमध्ये राहणे देखिल कठीण झाले परीणा या दुर्गंधीमुळे एखाअगरीकांना गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन सदर दुर्गंधीचा कायमचा बंदोबस्त करावा. अंबुजा कंपनीच्या व्यवस्थापकांनी त्यावर कायमचा उपाय शोधून अबुजा कंपनीत सुधारित यंत्रणा बसवून नागरिकांना दिलासा द्यावा कंपनी मधून निघत असलेल्या दुर्गंधीचा पंधरा दिवसात कायमस्वरूपी बंदोबस्त करावा असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने तहसील कार्यालया समोर उग्र आंदोलन करण्यात येईल तसेच कंपनी विरोधात न्यायालयात याविरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल होणाऱ्या परिणामास अंबुजा कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील असा ईशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री जळगाव, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, पर्यावरण व प्रदूषण मंत्री म. राज्य, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी जळगाव, आमदार चाळीसगाव, प्रांताधिकारी चाळीसगाव, शहर पोलिस निरीक्षक चाळीसगाव, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ धुळे यांना पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार .प्रदेश समन्वयक पि एन पाटील . विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड .शेतकरी सेना तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील .तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना पंकज पाटील.शहर अध्यक्ष योगेश पाटील. तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार.शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे.शहर कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर. समन्वयक रोहन पाटील.विजय सोनवणे. प्रफुल्ल देशमुख. अरविंद पाटील .शुभम देशमुख समाधान सूर्यवंशी .दीपक सोनवणे.दीपक देशमुख .शैलेश कुमावत. मधुकर चव्हाण.मराठा सेवा संघाचे अरुण पाटील अदि च्या सह्या आहेत.