अंपग युनिटमधील दलाल मोकाटच

0

जळगाव धुळे, नंदुरबार, नाशिक, गडचिरोली, पालघर, आबी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये झालेल्या अपंग युनिट बोगस शिक्षक भरती प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली असली तरी महिना उलटला अद्याप एसआयटी चौकशीसाठी आलीच नसल्याने हा फार्सतर नाही ना? असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अपंग युनिट बोगस शिक्षक भरती प्रकरणी गुन्हे दाखल होवून संबंधितांना अटक झाली. तथापि या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी व्हावी अशी मागणी आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वांधिक बोगस भरती असूनसुध्दा यासंदर्भात साधा गुन्हा सुध्दा दाखल झालेला नाही. जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून पोलिसात फिर्याद दिली. परंतु पोलिसांकडून अनेक कारणे दाखवून त्यासंदर्भात गुन्हा दाखल होवू शकला नाही. दरम्यान, याप्रकरणाचा पाठपुरावा करणार्‍या जि.प.कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची मात्र उचलबांगडी करण्यात आली. विधानसभा व विधानपरिषदेत आमदारांनी आवाज उठविल्यानंतर याप्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. विधानसभा अधिवेशन होवून महिना उलटा पण अद्याप एसआयटी ही नेमली नाही याची माहिती नाही. एसआयटीची घोषणा करून वेळ मारून नेण्यात तर आली नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्ह्यात अपंग युनिट अंतर्गत 181 शिक्षक समायोजित आहे. पैकी 94 शिक्षकांना जे आदेश प्राप्त झाले आहे. ते 94 शिक्षक बोगस असल्याचा दावा केल जातो आहेे. त्यांना अद्याप जि.प.अंतर्गत समायोजित केलेल नाही. यात काही परिचर सुध्दा आहेत. कागदावरच या शिक्षकांची यादी असल्याने त्यांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर याशिक्षकांचे संपूर्ण पत्ते ते मागतात त्यांना आदेश केव्हा प्राप्त झाला त्यांची प्रत्र ते पुराव्यासाठी मागतात सध्या स्थितीत ते कोणत्या ठिकाणी कामाला आहेत आदी मुद्ये पोलिसांना हवे आहेत. परंतु ही माहितीसुध्दा जि.प.कडे उपलब्ध नाही हे कसले दुर्देव म्हणावे पण प्रती महा हे शिक्षक मात्र पगार घेतात. यासर्व प्रकरणात कोट्यावधीचा घोटाळा झाला असून त्यात शिक्षण खात्यातील खालपासून ते वरपर्यंत सर्वांचे हात बरबटले असल्याचे बोलले जाते. जळगाव जिल्ह्यात पारोळा आणि भडगाव तालुक्यात सर्वांधिक बोगस शिक्षक भरती असल्याचे निदेशनास आले आहे. या घोटाळ्यात शिक्षण खात्यातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांना जिल्ह्यातील काही दलाल खुले आम हातमिळवणी केल्याचे बोलले जात आहे. यात अमळनेर तालुक्यातील दोन दलालांचा सक्रिय सहभाग असल्याचे बोलले जाते. त्यात एक दलाल हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे असे म्हणतात. एका शिक्षकाच्या भरतीसाठी 25 ते 30 लाख रूपये घेवून त्यांना आदेश दिल्याचे बोलले जाते. या सर्व बाबींची चौकशी व्हायची असेल तर शासनाने घोषित केलेल्या एसआयटीकडून कसून चौकशी होणे गरजेचे आहे. तथापि एसआयटीच्या घोषणेचा शासनाने हा फार्स केला आहे की काय? असा आता संशय बळावत चालला आहे. कारण अद्याप एसआयटीमार्फत कसल्याही चौकशीच्या हालचाली होत नाही. त्यामुळे अपंग युनिट बोगस शिक्षक भरतीमधील दलालांचे हाथ किती वरपर्यंत पोहचले आहेत. हे दिसून येते त्यामुळे चोर ते चोर वरून सिरचोर या म्हणनीप्रमाणे हे दलाल खुलेआम वावरत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील झालेल्या शालेय पोषण आहार घोटाळ्याप्रकरणी असाच अनुभव आलेला आहे. पोषण आहार घोटाळ्याची सुध्दा विधानसभेत चर्चा झाली. सदस्यांने आवाज उठविला माजी महसलू मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्याचा जोरदार पाठपुरावा सुध्दा केला परंतु विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्‍या आणि पोषण आहारात घोटाळा करणार्‍या सर्व संबंधित मक्तेदारावर अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही.हा घोटाळा करणारा मक्तेदार एका राजकीय पक्षातील नेत्याचा समर्थक असल्याने त्याच्यावर कारवाई केली नाही असे खुलेआमपणे बोलले जाते. तव्दत्च अपंग युनिट बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचेही होईल असे वाटते. काही कालावधी गेल्यानंतर आपोआप हे प्रकरण थंड्या बस्त्या जावून पडते. लोक विसरुन जातात. शासनाचा पैसा म्हणजे पर्यायाने जनतेच्य पैशावर डल्ला मारणारे हे दलाल खुलेआम वावरतात त्याचे काहीही वाकडे होवू शकत नाही ऐवढे मात्र निश्‍चित सरकार अपक्षाचे येवो अथवा ब पक्षाचे येवो. जनता मात्र भरडली जात आहे. त्याचे त्याना सोयरसुतक नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.