जळगाव :
जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेच्या एक लक्ष ३७ हजार ५४४ कार्डधारक लाभार्थ्यांसाठी एप्रिल महिन्याचा गहू, ज्वारी, मका आणि तांदूळ या धान्याचा साठा उपलब्ध झाला आहे. या योजनेंतर्गत गहू २२ हजार १० क्वि ंटल, ज्वारी ८२४.५० क्वि ंटल, मका ३ हजार २९५.५० क्वि ंटल प्रति एक रुपया किलो दराने असे एकूण २६ हजार १३० क्वि ंटल व तांदूळ २२ हजार १० क्वि ंटल प्रति तीन रुपये किलो दराने उपलब्ध आहे. पात्र लाभार्थी कार्डधारकांनी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले आहे.