अंत्यसंस्काराच्या सुविधाही चितेवर!

0

जळगाव, दि. 18 –

आयुष्याचा शेवट गोड व्हावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, मात्र जन्म-मृत्यूचा फेरा कुणालाही चुकलेला नाही. विविध कारणांनी सध्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, त्या तुलनेत जळगाव शहरातील स्मशानमूमींची संख्या तोडकी पडू लागली आहे. शहरातील चारही बाजून स्मशानभूमींची निर्मिती होणे गरजेचे आहे. नेरीनाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या थोड्याफार प्रमाणात सुविधा असल्याने तेथे अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. मेहरुण व शिवाची नगरातील स्मशानमूमीत पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने मृत्यूनंतरही हालआपेष्टा होतांना दिसून येत आहे.
शहरातील लोकसंख्या दिवसेंदिव वाढत असून नागरीवस्त्यांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. शहराच्या चारही बाजूने स्मशानभूमीची निर्मिती होणे आवश्यक झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेरीनाका येथील स्मशानभूमीत बर्‍यापैकी सुविधा उपलब्ध असल्याने तेथे अंत्यसंस्कार करण्यासाठी गर्दी होत असते. येथे सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने सुविधा उपलब्ध होत असता दुसरीकडे मात्र शहरातील अन्य स्मशानूमींची प्रचंड प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. मेहरुण परिसरात उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीत सुविधांची मोठ्या प्रमाणावर वानवा दिसून आली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तेथे बसण्याची योग्य सुविधा उपलब्ध नाही. पाण्याची सोय बर्‍याच दिवसांपासून नसल्याने नागरिकांना सोबत पाणी आणावे लागते. परिसरात कोटेरी झुडपे वाढली असून ते तोडले जात नसल्याने नागरिकांना त्यातूनच वाट काढावी लागत असते. स्मशानभूमीपर्यंत जाण्यास चांगला रस्ता नसल्याने हाल होत आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावरुन चालणे देखील जिकरीचे होवून बसते.
शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीत बर्‍यापैकी सुविधा असल्या तरी तेथेही शेवटची वाट बिकटच होवून बसली आहे. शेजारीच मोठा नाला असून त्याच्या दुर्गंधीचा लोकांना सामना करावा लागतो.लाकडांची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने बाहेरुन त्याची व्यवस्था करावी लागते. येथे मनपाचा कर्मचारी बर्‍याच दिवसांपासून फिरकत नसल्याने सुविधांची एैशीतैशी होवून बसली आहे.
नेरीनाक्याला प्राधान्य
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेरीनाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याला बरेच लोक प्राधान्य देतात, येथे सामाजिक संस्थांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याने तेथे आयुष्याचा शेवट गोड करण्यावर भर दिला जात आहे. नेरीनाका स्मशानभुमी जळगाव शहरातील सर्वात जुनी आणि सर्वांना जवळ आणि दळणवळणाची सुविधा सहज उपलब्ध होणारी स्मशानभुमी आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक या स्मशानभुमीला प्राधान्य देतात. तर कुटूंबातील वडीलधार्‍यांना त्याच ठिकाणी अग्नीडाग देण्यात आला होता, म्हणूनही अनेक जण तेथेच कुटूंबातील इतर कुणाच्याही मृत्यूनंतर अंत्यसंस्कार त्याचठिकाणी करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.