अंत्यविधीला जाताना आयसरच्या धडकेत पती-पत्नी ठार

0

पाचोरा :- आंबेवडगाव – मालखेडा दरम्यान आयसरने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. नातेवाईकांच्या अत्यंविधीच्या कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली.

जामनेर तालुक्यातील देवप्रिपीं येथील मधुकर रामकृष्ण खैरे (वय ५५), संगीता मधुकर खैरे (वय ५०) हे दाम्पत्य पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीला जात असताना शेंदुर्णी – पाचोरा महामार्गावरील आंबेवडगाव – मालखेडा दरम्यान पाचोराकडून शेदुर्णीकडे घरसामान घेऊन जात असताना आयसर (क्र. एम.एच. ०४ डी.डी.९३१३) ने मधुकर खैरे यांच्या हिरोहोडा स्पेलंडर (क्र.एम.एच. १९ बी.ए. ३४५४) ला जोरदार धडक दिली. या धडकेत खैरे दाम्पत्य जागीच ठार झाले.आयसर चालक घटनास्थावरुन फरार झाला आहे.
आयसर चालकांने अपघात होण्या अघोदर एक दुचाकीवरु जाणाऱ्या दाम्पत्यालाही कट मारल्याने तेही दांपत्य रस्त्याच्या खाली पडले असल्याचे कळते यात महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते.

Leave A Reply

Your email address will not be published.