मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- लॉकडाउन मध्ये सर्व शैक्षणिक आस्थापने,शाळा,महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ‛वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने हळूहळू शैक्षणिक कार्य चालू आहे. याच पार्श्वभूमीवर स्व.वि.गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय,जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषिदूत योगेश भानुदास पाटील यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव या उपक्रमा अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतूर्ली परिसरातील शेतकरी बांधवाना कृषीविषयक माहिती दिली. व मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची पूर्व काळजी आणि अळीचे संपूर्ण नियंत्रण या विषयावर माहिती देण्यात आली.यावेळी शेतकरी लक्ष्मण तुरूक, अक्षय पाटील, लक्ष्मण महाजन,निखिल पाटील हे उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिदूतांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई कार्यक्रम अधिकारी अविनाश आटोळे, समुपदेशक व्ही. टी.कपले , प्रा.दिपक सोनुने यांचे मार्गदर्शन लाभले.

