भुसावळ :- येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त दि.१२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता रोटरी हॉल, श्रीकृष्ण मंदिरमागे, चक्रधर नगर येथे भजनसंध्या आयोजित करण्यात आली आहे.
प.पु.महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, प.पु.भक्तीकिशोरदास शास्त्री, आ.हरीभाऊ जावळे, नगरसेवक मुकेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहिल. गायक रघुनाथ कश्यप, विजय चौधरी, जीवन महाजन, योगेश इंगळे, पेटीवादक विनोद कोळी, तबला वादक अनिल बर्हाटे, नालवादक बाळू लहासे असतील. उपस्थितीचे आवाहन प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, प्रकल्प समन्वयक विक्रांत चौधरी आणि अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.