मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलची मोठी बहीण हमिदा हिचे नुकतेच निधन झालेले आहे. ती कोरोनाव्हायरसने ग्रस्त होती. ठाण्यातील मुंब्रा येथे तिच्यावर उपचार सुरू होते. १ महिन्याच्या आतच छोटा शकीलच्या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातच त्याची धाकटी बहीण फहमिदा शेख हिचे निधन झाले होते.
छोटा शकील याच्या लहान बहिणीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. तिची कोरोना टेस्टदेखील झाली होती. फहमिदा मुंबईतल्या मीरा रोड येथे आपल्या कुटूंबियांसोबत राहत होती. तीचे पती आरिफ शेख व्यवसायाने प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात. बहिणीच्या निधनानंतर छोटा शकीलने त्याचा मेहुणे आरिफ आणि कुटुंबीयांशी फोनवर विचारपूस केली.
छोटा शकील कोण आहे?
छोटा शकील ६० च्या दशकाच्या मध्यात मुंबईत एक संशयित ट्रॅव्हल एजन्सी चालवत असे. १९८० च्या दशकात तो आणि दाऊद एकत्र येऊन एक माफिया म्हणून उदयास आले. तो दाऊदच्या अगदी जवळचा समजला जातो. अनेक तपास यंत्रणांचे असे म्हणणे आहे की, तो दाऊदची कंपनी डी कंपनी चालवत असे.