भङगाव (प्रतिनिधी)
भङगाव तालुक्यातील अंजनविहीरे येथे सतरावर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना घङली. ही घटना दि. ८ रोजी दुपारी २ वाजेपुर्वी अंजनविहीरे गावात घङली. याबाबत माहीती अशी की, अंजनविहीरे ता. भङगाव येथील रहीवाशी गुणवंत उर्फ मोन्या भाउसाहेब पाटील वय १७ वर्ष याने राहत्या घरात छताच्या सर्याला दोरीने गळफास घेतल्याने त्याचा जागेवरच मृत्यु झाला. याबाबत भङगाव पोलीस स्टेशनला बापुसाहेब पाटील पोलीस पाटील अंजनविहीरे ता. भङगाव यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मरणाचे कारण समजुन आले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेङ काँन्सटेबल किरण ब्राम्हणे हे करीत आहेत. या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. हा तरुण पाचोरा येथे आयटीआय मध्ये शिक्षण घेत होता.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post