अंचळगाव तांडा येथे स्नेहसम्मेलन उत्साहात

0

भडगाव :- तालुक्यातील अंचळगाव तांडा जि.प.प्रा.शाळा, अंचळगाव तांडा शाळेत वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र राठोड आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा एन.पाटील, प्रशांत पाटील, अभिराज चव्हाण आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी संतश्री सेवालाल महाराज आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फ़ुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी चिमूकल्यांनी उत्स्फूर्त कार्यक्रम सादर केले. उपस्थितांनी भरभरून दाद दिली आणि रोख स्वरूपात बक्षिसे जाहीर केलीत.

या कार्यक्रमाला पीम्परखेड केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक खेळकर, भोंडण ग्रामपंचायती चे उपसरपंच डॉ.धनराज पाटील, पारोळा तालुका महिला शिक्षक संघटनेच्या तालुका अध्यक्ष सिमा विठ्ठल पाटील, निकिता चौधरी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात सावित्रीमाई समूह सदस्या सिमा पाटील यांना बदली निमित्त शाळेतर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला.

यावेळी केंद्रप्रमुख अशोक खेळकर यांनी उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून सुरेंद्र बोरसे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. केंद्रप्रमुख अशोक खेळकर आणि सिमा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मुलांच्या गुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश पाटील, योगेश परदेशी, शीतल चव्हाण, मेनका चव्हाण. शण्कूतला राठोड, मदतनिस ताई यांचे अनमोल सहकार्य लाभले. सूत्रसंचालन विकास बोरसे यांनी तर आभार मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी मानले .

Leave A Reply

Your email address will not be published.