अंचलवाडी येथील आदिवासी कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या

0

आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री दाभाडे यांची तहसीलदार यांच्या कडे मागणी

अमळनेर(प्रतिनिधी) : तालुक्यातील अंचलवाडी येथे दि 16 मे रोजी आलेल्या चक्रीवादळा मुळे चिंचेचे झाड पडून हात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी  बल्लू पावराच्या दोन अल्पवयीन मुली जागेवरच मृत झाल्याची घटना घडली.या संदर्भात लवकरात लवकर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत प्राप्त करून दयावी असे निवेदन आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री दाभाडे यांनी नायब तहसीलदार पवार यांना दिले.

आपणास विनंती की दि 16 मे 2021 रोजी चक्री वादळाचा फटका तालुक्याला बसला आहे. याच वादळामुळे अंचलवाडी ता अमळनेर येथे राजेंद्र पाटील यांच्या शेतात हात मजुरी करणारे आदिवासी पावरा बल्लू बारेला चे  कुटुंब राहत होते. या कुटुंबाची छोटी झोपडी रस्त्याला लागून होती व तेथे हे कुटुंब वास्तव्य करत होते. दि 16 मे रोजी अचानक आलेल्या वादळात झोपडी शेजारी असलेले चिंचेचे खूप जुने झाड झोपडी वर कोसळले आणि यात या कुटुंबातील मोठी मुलगी ज्योती बारेला वय 16 व रोशनी बारेला वय 10 ह्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.याबाबतीत सर्व शासकीय कागदपत्रांची लवकरात लवकर पूर्तता करून  या कुटुंबास ताबडतोब शासकीय योजनांचा लाभ देत आर्थिक मदत प्राप्त करून द्यावी असे निवेदन देण्यात आले.

यावेळी अय्याज बागवान,राहुल बडगुजर,मनोज पारधी,पुनमचंद पारधी,उमाकांत ठाकूर,मंगेश महाजन,अनिल पारधी,विजय साळुंके इ उपस्थित होते.

दि 17 रोजी प्रा जयश्री दाभाडे यांनी पीडित कुटुंबाची अंचलवाडी येथे भेट घेतली यावेळी पोलीस पाटील,मालक राजेंद्र पाटील इ शी चर्चा करून कुटूंबाला लवकरात लवकर अर्थ साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्या संदर्भात निर्णय घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.