अंगावर पेट्रोल टाकून युवकाने पेटवून घेतले

0

जळगावातील थरार ; युवक ८० टक्के भाजला
जळगाव;- लग्न झाले नाही, कुठल्याही कामात यश नाही अशा कारणावरून एका युवकाने स्वतःला पेट्रोलने पेटवून घेत जीवन संपविण्याची थरारक घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास खोटेनगरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली असून युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो जवळपास ८० टक्के भाजला गेला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली .
हेमंत प्रभाकर गोपनारायण (वय ३८, रा.श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव)असे या युवकाचे नाव आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.