अंगणवाडी सेविका व मदतनीसांकरिता ‘सेल्फी विथ माय लाईफ’ स्पर्धेचे आयोजन

0

प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम

500 रोप वाटप ; वृक्ष संवर्धन करणाऱ्यास बक्षीस जाहीर

भुसावळ :- निसर्गात झालेल्या बदल व असमतोलपणा, वाढलेल्या वृक्षतोडी मूळे निर्माण झालेल्या समस्या,वाढत चाललेल्या तापमान व कमी झालेल्या पावसाचे प्रमाण यावर एक उपाय म्हणजे वृक्षारोपण होय .शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवून, आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना रोपे भेट दिली.शासना तर्फे प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2 वृक्ष लागवडीचे आदेश देण्यात आले आहे.त्या अंतर्गत सेविकांनी रोप मिळवण्यासाठी प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा सौ रजनी सावकारे यांच्याशी संपर्क साधला व रोपे मिळवून देण्यासाठी विंनती केल.

त्याची त्वरित दखल घेत  आमदार सावकारे यांनी त्यांना रोपे उपलब्ध करून दिली.अंगणवाडी सेविका कर्तव्यदक्ष असून त्या त्यांची कामे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात व वृक्षारोपण च्या या मोहिमेत सुद्धा त्या सक्रिय सहभागी होत आपले कर्तव्य पार पडतील हा विश्वास आमदार व्यक्त केला.भुसावळ येथील श्रध्दानगर येथे गणपती मंदिरा जवळ आमदार  संजय सावकारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्षांचे संवर्धनाची जवाबदारी येथील रहिवाशी अशोक अट्रावल व त्यांच्या कुटूंबियांनी घेतली.आमदार सावकारे यांचा तर्फे ‘ सेल्फी विथ माय लाईफ ‘ही स्पर्धा घोषित करण्यात आली त्या अंतर्गत चांगले वृक्षसंवर्धन करण्याऱ्या सेविकांना आमदार  तर्फे बक्षीस देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) भुसावळ चे आर. एम. सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट क्र.2 च्या पर्यवेक्षिका श्रीमती वैशाली  सावदेकर यांनी मागील वर्षी 350 वृक्षारोपण करून या वर्षी सुद्धा 500 रोपे (झाडे) लावून ही रोपे संवर्धन करण्याची  ग्वाही उपस्थित सर्व सेविका मदतनीसा तर्फे दिली .कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंगणवाडी सेविका मनीषा नेवे यांनी केले ,तर जया पाटील(सेविका) यांनी स्वागत गीत सादर केले ,कार्यक्रमाच्या यशस्वी त्यासाठी प्रतिष्ठा महिला मंडळ च्या   अध्यक्ष सौ रजनी सावकारे,सदस्य सौ अनिता आंबेकर,सौ अर्चना सोनवणे,अंगणवाडी सेविका अश्विनी पाटील, संगिता कोळी, पुष्पा राणे,अशहर बानो,जरीना तडवी, शकुंतला सावकारे, संगिता निंभोरे, वैशाली निंभोरे ,रजनी नेमाडे इ. यांनी  परिश्रम धेतले. वृक्षरोपणास आमदार संजय सावकारे व सौ रजनीताई सावकारे व पर्यवेक्षिका श्रीमती वैशाली सावदेकर यांनी वृक्षारोपण साठी रोपं उपलब्ध करून दिली ,सेविकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व मार्गदर्शन केले .

Leave A Reply

Your email address will not be published.