यावल : भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार अँड.देवकांत बाजीराव पाटील (रा.विरावली) यांना जाहीर करण्यात आला आहे. मागील 10 वर्षा पासून त्यांनी जे समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून समाज हिताचे प्रोबोधनाचे उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल त्यांना यावल तालुक्याचे तहसीलदार जितेंद्र परशराम कुंवर व भारतीय बहुद्देशीय पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष याकूब पटेल, नायब तहसीलदार आर के पवार यांच्या शुभ हस्ते सन्मान पत्र व पुष्पगुछ (प्रमाणपत्र )देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पत्रकार जीवन चौधरी, सुनील गावडे, संतोष पाटील, हेमराज पाटील, विनोद पाटील आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
मागील गेल्या 10 वर्षा पासून अँड .देवकांत बाजीराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या मध्यमातुन विविध कार्यक्रम राबून समाज सेवेची अनेक उल्लेखनीय कार्यक्रम यशस्वी केले आहेत त्यात त्यांनी त्यांच्या लग्नाच्या दिवशी त्यांनी व त्याच्या पत्नी देवकांत पाटील व सौ योगिता देवकांत पाटील यांनी नेत्रदानाचा संकल्प केला , विद्यार्थी साठी संस्थेच्या माध्यमातून मोफत संगणक शिबिर विविध स्पर्धा परीक्षा चे आयोजन त्यांना मार्गदर्शन करून बक्षीस वितरण करणे आदिवासी विध्यार्थी ना स्वयं रोजगारा साठी सुशिक्षित बेरोजगार मेळावे आयोजित केले , रक्त तपासणी , रक्तदान शिबिर ,बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम ,वृक्ष लागवड करणे समाजातील गरीब गरजू विद्यार्थीना शैक्षणिक मदत करणे या सारखी अनेक कामे संस्थे च्या माध्यमातून त्यांनी केली आहेत त्याच प्रमाणे राजकारणाच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्या साठी मोफत पास साठी नेवेदन ,परीक्षा कालावधीत होणारे वीज भार नियमन विरोघात आंदोलन करणे , तर कधी शेतकर्या साठी कापसाला हमी भाव मिळावा म्हणून आंदोलन तर कधी विविध विषयांवर प्रशासनाला निवेदने दिलीत ,म्हणून राष्ट्रवादीने पक्षाने त्यांना सुरवातीला विध्यार्थी तालुका अध्यक्ष तर अलीकडच्या काळात यावल राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली तसेच यावल शहर व परिसरातील समाज हित युवकांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि विकासात्मक कार्य प्रवृत्तीचा एक ओळख असलेले नवं उभरत नेतृत्व म्हणून ते पुढे येत आहेत तसेच राजकीय मंचाच्या माध्यमातून जन सामान्यांच्या समस्या सोडवून त्यांना कशा प्रकारे लाभ दिला जाऊ शकतो त्याचे नवे उदाहरण त्यांनी यावल शहर व परिसरातील त्याच्या कार्यातून ते दिसून येते आणि त्याचीच दखल घेऊन भरतीय बहुद्देशीय पत्रकार संघ यांनी यंदाचा “सम भाव “पुरस्कार ऍड देवकांत पाटील यांना देणार आला .
या पुरस्कारा मिळाल्या नंतर सर्वच स्थरातून पाटील यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यात मराठा सेवा संघ यावल तालुक्याचे अध्यक्ष अजय पाटील सर, माजी नगरअध्यक्ष शकांक दादा देशपांडे, जि प गट नेते प्रभाकर सोनवणे, माजी उपनगर अध्यक्ष व विद्यमान नगर सेवक मुकेश येवले, जि प सद्स रवींद्र पाटील आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी, पंचायत समितीचे काँग्रेस गट नेते शेखर पाटील, स्वराज फाउंडेशन अध्यक्ष अड् भरत चौधरी ,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे संपर्क प्रमुख भूषण नागरे, डॉ हेमंत येवले, गुणवंत निळ, डॉ फिरोज तडवी ,चंद्रकांत येवले, हेमराज पाटील , विकास इंदवे, राजू कारंडे, किशोर माळी, नरेंद्र शिंदे , हितेश गजरे, प्रदीप पाटील आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या आहेत.