१५ हजाराची लाच भोवली ; जवखेडेतील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

0

जळगाव प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील तलाठ्यास लाच मागणी चांगलीच भोवली आहे. शेतीच्या जागेवर शाळा बांधल्यानंतर तहसीलदारांनी नोटीस बजावल्यानंतर तक्रारदारावर कारवाई टाळण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या जवखेडे येथील तलाठ्यास एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

 

तक्रारदार यांचे अमळनेर तालुक्यातील जवखेडे शिवारात शेत आहे. शेताच्या जागेवर शाळेसाठी बांधकाम केले आहे. तहसीलदार यांनी नोटीस बजावल्यानंतर तक्रारदाराने 32 हजार ४२६ रूपयांचा दंड देखील भरला मात्र त्यानंतरही कारवाई करण्याची धमकी देवून पुढील कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच जावखेड येथील तलाठी मुकेश सुरेश देसले (वय-४५) रा. धुळे यांनी मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागात तक्रार दिल्यानंतर आज दुपारी १२.३० वाजता सापळा रचून १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना तलाठी देसले याला रंगेहात पकडले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.